देवाचा पराभव

       प्रत्येक आत्म्याच्या ठायी ईश्वराचे रूप असते;  ते प्रत्येकाच्या आईच्या रूपात  आपल्याला भेटते. आईची माया केवळ जन्मदात्या आई मध्येच असते असे नाही तर तो मातृत्वाचा ओलावा प्रत्येक स्त्रीच्या काळजात भिनलेला असतो.  तिच्या लेकरासाठी देवाशी झुंझ द्यायला ती घाबरत नाही;  देवाचा पराभव करण्याची शक्ति तिच्यात मातृत्वाने दिलेली असते. 

 त्यामुळे प्रत्येकाने आई समजून घेणे काळाची गरज आहे.  पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमए दिवसागणिक वाढत आहेत यासारखे दुसरे दुख कोणते असणार?

आज पत्रकार दिनानिमित्य ज्येस्ट पत्रकार उत्तम कांबळे यांच्या “आई समजून घेताना”  या पुस्तकाच्या आधारे स्त्रीतल्या मातृत्वाचा शोध  घेण्याचा प्रयत्न करू. 

कुणाचा जन्म कुठे होईल हे सांगता येत नाही.  पण आपला जन्म कुठे ना कुठे होत असतो रुग्णालयात,  घरी,  प्रवासात, तर  काहींचा कदाचित कार्यालयात होत असेल पण उत्तम कांबळेंचा जन्म शेतात  झाला. त्यावेळी त्यांची आई शेत काम करीत होती. आज अनेक माता  बाळंत झाल्यावर विश्रांती घेतात;  मुलाला जन्म देऊन घर गाठण्यासाठी 3 की. मी. अंतर पायाने चालत जाऊन घरच्या मंडळींना ते बाल दाखवले.  त्यावेळी त्यांच्या आईचे वय 11 वर्षे होते.  विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवड्या कमी वयात तिला ही धाडस कसे करता आले असेल? 

 त्या बाळ वयात त्यांना अनेक कष्टाची कामे करावी लागत असत अगदी जे कामे पुरुषांची म्हणून गणली जातात ते त्यांना करावी  लागायची दगड फोडण्यापासूण विहीर खोडण्या पर्यंत सर्व कामे आईला करावी लागली.  तरी ही त्या खचल्या नाहीत मुलाला शिकवत राहिल्या पोट भरण्यासाठी त्यांना शेतकऱ्याच्या शेतात चोरी करावी लागे ; पण त्यांनी मुलाला कधी चोरू दिले नाही.  वडील दारोडे असल्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून ३ दिवस त्या घर सोडून गेल्या होत्या.  असे किती तरी प्रसंग त्यांच्या आयुषात घडले आहेत  पण त्यांच्यातील आई कडी हि मुलांपासून दूर गेली नाही. दारू कुटुंब कसे उद्वस्त करते हे वाचण्यासाठी  https://www.premsparsh.com/2021/05/blog-post_28.html  

त्या  लिहिणे-वाचणे शिकलेल्या नसल्या तरी त्यांनी दिलेले धडे आजच्या फळ्यावर लिहिलेलया सुविचारांपेक्षा आचरणात उतरावे असे होते. [ गरिबाने भूक भागवण्यासाठी जास्त पानी प्यावे आणि कमी अन्न खावे,  शेण एक डिवस सुखल्यावर उडून जाते त्या खाली दबलेल्या किड्याना मुक्ती मिळते]  अशाप्रकारे रोजच्या जीवनातील घटनांचा दाखला देऊन आयुष्याचे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येकाची आई एक चालते फिरते विद्यापीठ असते.  मित्राच्या घरी राहत असताना त्या आइणि अनेक  चांगले संस्कार केले;  त्यामुळे त्यांनी सर्वांमधली आई समजून घेण्याचा प्रयत्न केला. आई फक्त देणे जाणते ती कधीच स्वतःसाठी काही मागत नाही.  असे निस्वार्थी प्रेम आईचे असते. आजच्या काळात खूप परिवर्तन झाले स्त्री शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिली,  ती चंद्रावर गेली,  मंगळावर पोहचली,  ती वैमानिक होऊन हवेत झेप घेते,  ती रस्त्यावर भीक मागत दिसते,  दिवस भर शेतात हाडाचे मनी आणि रक्ताचे पानी करते,  आज देखील पुरुष प्रधान व्यवस्थेचा बळी ठरते,  बाल विवाह आज देखील घडवून आणले जातात,  हे अशा प्रकारे कष्ट करून संघर्ष करून आपल्या लेकराचे भले व्हावे म्हणून प्रत्येक आई धडपड करीत असते. फक्त तिच्या पोटच्या गोळ्यासाठी.  सगळ एकीकडे सुरू असताना एका गोष्टीची खंत वाटते;  ज्या आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट उपसले;  त्यांची मुले वृद्धापकलात त्यांना असह्य करतात २ पिढ्यांमधील अंतर समजून ण घेता त्यांच्या कष्टाना मातीत मिळवतात.  हे सगळे थांबवणे आपले आद्यकर्तव्य आहे.  उत्तम कांबळे सरानी आईच्या हयातीत [ आई समजून घेताना ] हे त्यांच्या आईला समर्पित पुस्तक लिहिले. पण सर्वाना पुस्तक लिहिता येणारच असे नाही; आई-बाबाना आयुष्यभर अपमानित करू नका त्यांना जगासमोर ताट  मानेने फिरता येणार असे वागा. 

 आपण सर्वानी आईचे मोल समजून घेताना लक्षात ठेवले पाहिजे “शिकलेली आई घराला पुढे ने”  त्यामुळे प्रत्येक स्त्रीत आई शोदहा;  त्यातूनच पुन्हा उत्तम जन्माला येईल.   

फोटो - Google


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा