नकारत दडलेला होकार

प्रेम गरीब- श्रीमंत उछ- नीच काळ-गोरा गाव- शहर यातील भेदाभेद संपवून टाकणारे नाते  निर्माण करते.निरपेक्ष परस्परांची भक्ति करावी लागतए अग्नि दिव्य पारपाडावें लागतो; आप्तेष्टांचा संताप सहन करावा लागतो, प्रेमासाठी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असावे लागते. हे सर्व धाडस करण्याची शक्ति,  आणि कुटुंबात एकता प्रसतापित ठेवण्याची युक्ति होती इंदिरा मध्ए;  फिरोजवरच्या अतूट श्रद्धेमुळे शक्य झाले असेल. नेहरू घराने नेहमीच स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते.  मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेरू नंतर इंदिरा गांधी हा इतिहास आपल्या समोर आहेच. 

 1930 साली कमलाबाई नेहरू प्रदर्शन करत होत्या;  अचानक त्या बेशुद्ध पडल्या.  आणि फिरोज गांधींनी मानवतेचे दर्शन घडवले.  त्यांची मनोभावे सेवा केली. त्याचा परिणाम इंदिराशी अधिक जवळीकता वाढली;  आणि फिरोज मनातील भावनांना आवर घालू शकले नाहीत इंदिरा केवळ 13 वर्षांची असताना तिला प्रेमाचे साकडे घातले.  आणि तयारी ण करता दिलेल्या परीक्षेत अपयश ठरलेले असते तसेच त्यांच्या सोबत झाले;  आणि थेट नकार भेटला.  फिरोजच्या जागेवर आजचा कोणी फिरोज असता तर खचला असता, नैराशात बुडून आत्महत्या केली असती,  नाही तर ज्वलनशील पदार्थ फेकून त्याने आपला पुरुषार्थ साधला असता; पण त्यांनी तसे  काही केले नाही.  सअय्यम कायम ठेवला आणि इंदिराशी मित्रता कायम ठेवली. 

“1936 साली इंदिराच्या आईचे दुर्दैवी निदण झाले.  इंदिरा एकटी पडली आतून पूर्णपणे खचली” या कठीण काळात तिला फिरोजणी आधार दिला. नवीन आयुषाला सुरुवात करायला बल दिले या वागणुकीतून त्यांच्यात प्रेम संबंध प्रस्थापित झाले.  नंतर दोघे ही इंग्लंडला शिकायला गेले तितहे नाते अधिक घट्ट झाले.  1942 साली त्यांनी विवाह करण्याचे ठरवले त्याला प्रचंड विरोध झाला. 

आज देखील प्रेम विवाह वास्तव कि आभास? असा प्रश्न निर्माण होतो सविस्तर विवेचन वाचण्यासाठी  https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_31.html 

त्यावेळी दोघे आपल्या निर्णयावर ठाम राहिले;  शेवटी त्यांनी आपला संसार थाटला.  नंतर राजकारणात दोघे देखील सहभागी झाले देशाच्या पंतप्रधानांचा जावई असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही असा त्यांचा खाक्या होता.  शेवट पर्यंत फिरोज स्वाभिमानाने जगले.  इंदिराच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता.  म्हणून कुठल्या हि प्रकारचा राग न ठेवता इंदु बाबांना मदत करत राहिली.  यामुळे फिरोज आणि इंदिरा  यांच्यात नंतर ताणतणाव वाढत गेले; तरी ते विभक्त झाले नाहीत. 

 एका दिवशी अचानक फिरोजची तब्यत खालावली त्यातच त्यांचे निधन झाले.  या कठीण प्रसंगी इंदिरा फिरोज सोबत होत्या. फिरोजच्या जाण्याने त्यांचे न भरून निघणारे नुकसान  झाले. त्यांच्या नात्याविषयी  इंदिरा गांधी म्हणाल्या [आमच्यात कितीही मतभेद असले तरी एकमेकांवरचे प्रेम कधीही कण भर कमी झाले नाही. ] 

 आज देखील प्रेम विवाह करणाऱ्याला प्रचंड विरोध होतो पण दुर्दैवाने ही प्रेमी जोडपे आपल्या प्रेमासाठी जन्म दात्यांच्या प्रेमाचा बळी देतात,  आम्हाला सर्व प्रकारच्या प्रेमाला न्याय देता येईल का? 

 विचार करा सत्ता आणि संपत्तीला बळी पडणाऱ्यानी स्वाभिमान प्रेमात देखील टिकवता येतो का? तपासून पहा 

मतभेद असतात ते स्वीकारायला शिका,  होकार मिळवण्या पूर्वी नकार आनंदाने पचवण्याची सवय करुन घ्या,  ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे त्या व्यक्तीचा आदर करायलाच हवा.  प्रेम मिळवण्या पेक्षा प्रेम देण्यात अधिक त्याग असतो;  त्यागी वृत्ती निर्माण करा शेवटी आपापल्या फिरोज आणि इंदिराचा शोध घ्या.  प्रेमाचे नाते अतूट असते त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची ताकद असते. मानवी स्वभाव हा विलक्षण आहे.एकदा विचारणा विचार जुडले कि, शारिरीक व्यंग असेल तरी प्रेम कायम असते पाकिस्थानातील एका जोडप्याने अशा परिस्थितीत नाते टिकवले आणि आता त्यांच्या संसारात ते आनंदी आहेत.  त्यांची संसार गाथा वाचण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_29.html 

शेवटी अनेक लोक आम्ही प्रेम बीम काही करत नाही असे म्हणतात पण त्यांच्या जीवनातील अदृश्य असणारे प्रेम त्यांना जगायला प्रेरणा देत असते; याचे त्यांना भान राहत नाही. 

जीवनात समाधानी राहायचे असेल तर प्रेम द्यायला शिका जसे इंदिरा आणि फि

रोज एकमेकांना देत होते. 
फोटो - साभार गूगल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा