सेवकाच्या प्रेमात महाराणी

 

माणसांना लागलेले बिरुद गळून पडते, गरीब श्रीमंत यातील भेद नष्ट पावते, तो फक्त प्रेमात काला गोरा रंग जाऊन  केवळ जिवाडा निर्माण होतो . प्रेमातच पद स्थान याचे भान राहत नाही; याच प्रेमात आयुष्यातील सर्वदा समाधान देणारी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीशी प्रेमाची नाळ जुडली त्याचा सहवास. मग तो कुणाचा हि असो त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची किंमत मोजण्याची तयारी असते या प्रेमी युगुळांची. दुःखाचा स्पर्श न झालेली, जन्मतः साम्राज्याची प्रमुख म्हणून वाढलेली, व्हीकटोरीय राणी एका संघर्ष करून नोकरी  मिळालेल्या नोकरदारांच्या प्रेमात पडेल; हे जवळ जवळ अशक्य प्राय घटना घडली ती केवळ एका भेटीमुळे. आग्र्याच्या तुरुंग अध्यक्षाने राणीला भेट द्यायचे ठरवले; त्यासाठी दोन सेवकांची निवड केली. अब्दुल करीम आणि त्यांचे वडील दोघे ही त्याच तुरुंगात नोकरी करत होते राणी सत्तरीत तर अब्दुल २५ वित्त होते एक सामान्य शेवक ते सोयंपाकी थेट सहायक हा मोठा प्रवास केवळ एका वर्षात अब्दुल भाईंनी पार केला त्यांच्या यक्तीमत्ववर राणी भलतीच खुश झाली; तिने आपल्या महालातील एक घर त्यांना राहायला दिले. राणी सागरी प्रवास करू शकत नव्हती; त्यामुळे त्या अब्दुल यांच्याकडून भारताचे सर्व चारित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करून घेत असत. भारतातील राजकारण, हवामान, संस्कृती, सामाजिक स्थिती त्या दरम्यान इथल्या अल्प संख्यांकांची स्थिती त्यांना सांगितल्यावर राणीने एक पत्र लिहून व्हाईस रॉयलया काही प्रश्नांवर खुलासा मागितला. राणी अब्दुल करीम यांच्यात संपूर्ण भारत शोधत असे. त्यांचे नाते सेवक आणि मालकीण असे नव्हते. राणीला चिकन करी आवडत असे अब्दुल त्यांना करून देत असत एकदा अब्दुल भाई प्रचंड आजारी पदले त्यावेळी राणी सर्व लव जमा बाजूला सारून त्यांची सुश्रुषा करायला त्यांच्या घरी जात असे; सर्व डवऱ्यात ते सोबत   असत एकदा  युरोप  भेटीला राणी जाणार होती; त्यावेळी अब्दुल करीम यांना सोबत घेऊ नये असा आग्रह अनेकांनी केला. अन्यथा आम्ही सर्व राजिनामा देऊ अशी धमकी दिली; पण राणीने त्यांना न जुमानता अब्दुल भाईंना सोबत घेतले धमकी पोकळ ठरली; कुणीच राजिनामा दिला नाही. राणी उर्दू शिकली तिने एका वर्षात उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. दिवस भरात ती त्यांना सात पत्र पाठवत असे; माय लेकाचे हे नाते दिवस  गणिक
बहरत गेले. राणीने त्यांना ३०० एक्कर जमीन आग्रा जिल्ह्यात घेऊन दिली. तिच्या काही पत्रात ट्रिपल एक्स हि चुंबनाची खून असल्यामुळे लोकांनी आपापल्या चष्म्यातून अर्थ काढले; पण राणी जिवंत असे पर्यंत उघडपणे कोणी बोलले नाही. पण राणीच्या मृत्तिव नंतर अब्दुल यांना प्रचंड त्रास देण्यात आला; राणीने पाठवलेली सर्व पत्रे जाळून टाकण्यात आली. नात्यांची उंची व्यक्ती पेक्षा फार मोठी असते; चोचीत दाना भरणारी चिमनीतली माय, वासराला  चाटणारी गायीतील माय, विलक्षण असते नाते कसे हि असो त्यातील प्रेमाचा जरा   कायम असेल तर इतरांच्या नजरेच्या आगीने अथवा समाजाच्या द्वेषाने ते नाते कधीच जळून खाक होऊ शकत नाही. प्रत्येक नात्याची छाप काळावर पडलेली असते; शाहजहान आणि मुमताज यांचा ताजमहल दसरत मांजिणे पत्नीच्या स्मृत्यर्थ पर्वत फोडून केलेला रस्ता नाही; तर महाविद्यालयातील प्रेमीनी एक मेकांना उद्देशून केलेली कविता या सर्वांत एकच उत्कट भावना असते. त्या विरहात बुडून हे सर्व बाहेर येते आयुष्यात अनेकांना आपल्या जोडीदाराची निवड करण्याचे  स्वातंत्र्य नसते

; हि सर्वांत मोठी सामाजिक समस्या आहे. आज तुमचे प्रेम संबंध असणे सामान्य गोष्ट आहे; तरी देखील तरुणांना त्यांच्या या नात्यात अनेक अड्थडे निर्माण केले जातात. अर्थात मोठ्या प्रमाणात आपल्यातील पूर्वग्रह याला कारणीभूत आहेत. या सामाजिक मानसिकतेत बदल घडवावा         

  • एवढीच अपेक्षा 
फोटो - pixabay aap

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा