राष्ट्र पित्याची संसार गाथा

 

काही कुटुंबे असे असतात ज्यांची कर्म भूमी अमर्याद असते; काही जोडपी अशी असतात ज्यांचे केवळ जन्माला घातलेले मुले स्वतःची असत नाहीत तर संपूर्ण समाज त्यांच्यासाठी लेकरा समान असतो. त्या मुलांना मोठ्या मनाने माप करण्याचे हृदय त्यांच्याकडे असते;
मुलांनी काही चूक केली तर त्यांचा कां धरून त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे अधिकार त्यांना असतात; असे आदरयुक्त सामाजिक स्थान असणारी व्यक्ती म्हंजी कस्तूरबा मोहनदास हे गांधी दाम्पत्य आहे. 2 मित्रांनी आपल्या मित्रत्वाचे नात्यात रूपांतर करायचे ठरवले; आणि केवळ 6 वर्षांच्या वयात कस्तुरबा आणि मोहनदास यांचा विवाह ठरला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. कस्तुरबा यांचा जन्म ११-४-१८६९ रोजी झाला तर गांधीजींचा ०२-१०-१८६९ रोजी झाला अर्थात ते सहा महिन्यांनी लहान होते. सुरुवातीला योग योगाने वडिलांनी एका रूढ प्रतेला फाटा देऊन नवा प्रवाह सुरु केला. अजून देखील पती पेक्षा पत्नी लहान असावी हीच प्रथा आहे. बापू विलायतेला शिक्षण घेण्यास गेले असताना, त्या एकट्या राहिल्या; एक मेकावरील दृढ निष्ठा हे त्यांच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारे होते. एका खटल्यासाठी बापू आफ्रिकेत गेले असताना त्यांनी कस्तुरबांना सोबत नेले; तिथे त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. तिथल्या इंग्रज सरकारने एक कायदा करून हिंदू विवाहाचा अधिकार काढून टाकला; अर्थात ख्रिष्टी लोकांच्या विवाहाची सरकार दरबारी नोंद केली जात असे. पण हिंदूंचा त्याच बरोबर मतदानाचा अधिकार हिरावला गेला. तिथे गांधीजींनी आंदोलन सुरु केले; त्यातील महिलांचे नेतृत्व कस्तुरबांनी केले. तिथे त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व सांगत असत. पण त्या स्वतः घाण साफ करून आपल्या कृतीतून शिकवण देत असत. गांधीजींनी महिलांना आंदोलनात उतरवले त्या आधी स्वतःच्या पत्नीला त्यासाठी तयार केले. इतर महिलांना शिक्षणाचे उपदेश देण्या पूर्वी निरक्षर कस्तुरबाला साक्षर केले. आज जगाला प्रकाश दाखवणारे अनेक आहेत पण स्वतःच्या घरातील अंधार दूर करणारे फार थोडे आहेत; गांधीजींचे व्यक्तिमत्तव  हे स्वतःपासून सुरुवात करणारे होते. ते नेहमी म्हणायचे [ जो बदल तुम्हाला इतरांमध्ये घडवायचा आहे तो बदल स्वतःत करा ] हेच ब्रीद ते स्वतः जगले. त्यांना एका मागून एक ४ मुले झाली. हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास १९१५ साली गांधीजी आपल्या कुटुंबासह भारतात आले; त्यांचे मोठे स्वागत झाले. त्यानंतर त्यांना चंपारनला बोलावणे आले; त्यांनी तिथे शेतकऱ्यांचा सत्याग्रह घडवून आणला आणि यशस्वी झाले. त्यापासून स्वतंत्र प्राप्ती पर्यंत त्यांचे आंदोलने सत्याग्रह अविरत सुरु झाले. तुरुंगवास देखील त्यात समाविष्ट आहे. कस्तुरबांना ३ महिने तुरुंगाचा अनुभव आफ्रिकेत आला होता. त्यामुळे त्यादेखील सज्ज्य झाल्या होत्या साबरमती आश्रम आणि सेवाग्राम आश्रम हे त्यांच्या आयुष्यातील अनेक क्षणांचे साक्षीदार बनले. आश्रमात सर्वांसोबत काम करत असत त्या आश्रमाची जवाबदारी सांभाळत असत. बापू तुरुंगात गेले कि, त्या आंदोलन पुढे सुरु ठेवत. एकदा शेतकऱ्यांनी गांधीजींच्या सांगण्यानुसार कर भरायला नकार दिला; त्यावेळी बा आजारी असताना तिथल्या महिलांचा उत्साह वाढवायला गेल्या होत्या. राजकीय आंदोलन सुरु असताना समाज सेवा सुरु ठेवली; सामाजिक कार्य करत असताना, चरख्याच्या माध्यमातून सहकारी उद्योग सुरु ठेवला. त्याच बरोबर दारू बंदीसाठी  आंदोलन करून वेसनमुक्तीचा संदेश दिला. त्यांनी लक्ष्मी नावाची एक मुलगी दत्तक घेऊन प्रुश्य अस्पृश्य हा भेदाभेद मिटवला; माणुसकी पेक्षा दुसरी जात नाही. त्यांच्या आश्रमात जाती नव्हत्या गरिबी श्रीमंती हि विभागणी नव्हती. या कुटुंबाच्या dr. सुशीला नायर आपल्या एका पुस्तकात लिहितात, " कस्तुरबा दररोज रोजनिशी लिहीत असत त्या वेळेचे भान ठेऊन काम करत असायच्या; आपण काही तरी मोठे कार्य करत आहोत असा त्यांचा अविर्भाव कधीच नसायचा. तिथल्या प्रशासनाला त्या विनंती करायच्या माझ्या आधी माझ्या सहकार्यांची सुटका करा. " एरोडा तुरुंगात उपोषणाला बसलेल्या बापूंच्या प्राणाची विनवणी करणारी पत्नी, १९०६ साली बापूंनी एकतर्फा घेतलेला ब्रम्हचाऱ्याचा निर्णय स्वीकारणारी पत्नी, ते ज्यांना जन्म दिला नाही त्या मुलांची काळजी घेणारी माता, आपल्या कृतीतून सेवेचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारी शिक्षिका, एका हाकेवर इतर महिलांसाठी धावून जाणारी सखी असे कितीतरी भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांचा संसार खऱ्या अर्थाने मित्र मैत्रिणीचा संसार होता; दुजाभाव नसून सद्भाव होता. एकमेकांच्या चुका दुरुस्त करणे हे त्यांच्या सुखी संसाराचे गुपित होते. बांचे निधन १९४४ साली झाले; आणि राजकारणातला संत आतून खचला . आयुष्य जिच्या सहकार्याने फुलले ती गेली; म्हणजे ठामपणे टोकणारी, कठीण प्रसंगात साथ देणारी, घेतलेल्या निर्णयाला सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर पर्यंत साथ देणारी, प्रशिद्धीच्या झोतापासून दूर राहून जवाबदारीच्या विळख्यात स्वतःला टाकणारी, आयुष्याच्या पटकथेला आकार देणारी, साहचरणी गेली आणि अहिंसेचा दूत पोरका झाला. ज्या मुलांशी रक्ताचे नाते आहे त्यांना केवळ संस्काराचा वारसा दिला; कोणतेही कुटुंब आपल्या मुलांपुरते मर्यादित नसते तर संपूर्ण देश आपले कुटुंब असते. अशा या भारत राष्ट्र कुटुंबाचे राष्ट्रप्त गांधीजी आहेत तर राष्ट्र माता कस्तुरबा आहेत. विविधतेत एकटा हे तत्व त्यांनी अंगिकारले. तसे ते सर्व महापुरुषांनी अंगिकारले कोणत्याही महामानवाने आपल्या जाती धर्माच्या चौकटीत राहून काम केले नाही; तरी देखील त्यांना जातीत विभागले जाते. पण गांधी दाम्पत्याला जातीचे बंधन आपल्यात अडकवू शकले नाही. विलायतेला शिक्षणासाठी गेले त्यावेळी त्यांनी जात पंचायतेने वाडीत टाकले त्यापासून ते या बंधनातून कायमचे मुक्त झाले.         

  • राष्ट्रपित्याची हि संसार गाथा अनेक संसार उभी करणारी आहे.  

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा