पत्नीचा पुरुषार्थ

जगी जीवनाचे सर घ्यावे जाणउणि सतवर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ऱ्ए ईश्वर. 

आयुषात त्या परमात्म्याचे अस्थान व्यक्ति गणिक वेगवेगळे असू शकते;  पण त्या प्रत्येकाच्या आयुषात एक नेहमी दैवी आनंद देणारे व्यक्तिमत्व असते ते पत्नीच्या रूपाने.  एक पुरुष आपल्या छोट्याशा यशाचा डंका पिटवतो;  पण त्यासोबत मेहनत असते स्त्रीची जी केव्हाच स्वतःचे कौतुक करून घेत

नाही.  तसई तिच्या मनात इचहा देखील नसते;  ती नेहमी मोठ्या मणाने माप करते.

ग्रामपंचायत निकालात विजय मिळाला म्हणून विजयी उमेदवारच्या पत्नीने त्याला खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून चक्कर मारला.  आणि ही पुणे जिल्ह्यातील खेद तालुक्यातील घटना संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली;  कारण एखादी पत्नी पतीला खांद्यावर घेते ही पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या गालात मारलेली चपराक होती.  मग अशी घटना घडत असताना सहज लक्षात येते की,  वेंकटेश माडगूळकर यांचा बंगरवाडी या कादंबरीत शकू आणि त्याची बायको शेतात पेरणी करतात;  त्यांच्याकडे एक बैल असल्यामुळे ती स्वतः दुसरीकडून तिफण खांद्यावर घेते;  आणि कादंबरीगत गावात चर्चेचा विषय ठरते.  काल्पनिक विश्वात किवहा वास्तविक जगतात तिने शौर्याचे कामे करणे समाजासाठी आश्चर्याचे असते;  एकट्याने काही होत नाही;  दोघे जर एकतर आले तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही.  या कथणाला सारतक करणारे अनेक पती -पत्नी आज उदाहरण म्हणून दाखवता येतील त्याच धर्तीवर अनेक पती दुर्घटणेमुळे आजारपणामुळे निष्क्रिय झाले;  तर घराची सर्व सूत्रे ती हाती घेण्यास कुचराई करत नाही.  विचार करण्यासारखी गोष्ट एवढीच नवरा दारू पितो म्हणून अनेक बायका दारूबंदीसाठी आंदोलन करतात.  पण एखादी पत्नी दारू पित असेल तर तो पुरुष आंदोलन करेल की सरल तिला मआर हां करून तिच्यापासून विभक्त होईल.  तिच्या मध्ये असणारा हा सअय्यम येतो कुठून?  हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.  पण तिच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये. 

अनेक पुरुषआपली मर्दानकी सिद्ध करण्यासाठी तिचा छल करतात,  एखाद्या यंत्राप्रमाणे वापरुन घेतात,  वाटेल त्यावेळी उपभोगाची वस्तु समजून उपभोग घेतात,  तिला देखील भावना आहेत काही सुप्त इचहा आहेत याचा कोणी विचारच करत नाही.  तिला नेमकी अपेक्षा काय असते तर केवढ दोन शब्द प्रेमाने बोलवावे माणसासारखा तिच्याशी वयेवहार करावा

विथळ आणि रुखमिनी 28 युगांपासून विटेवर उभे आहेत का तर भक्त पुंडलीकला त्यांना भेटायचे आहे;  पण पुंडलिकाची आई वडिलांची सेवा अध्याप सुरू आहे.  भक्त पुंडलिकाची भेट पांडुरंगाला घेण्याची इचहा असली तरी त्याच्यासोबत रुखमिनी उभी आहे;  संसारात तुमच्यासोबत सुख दुखत ती साथ देत असते,  केवळ ते पाहण्यासाठी खुली दृष्टी असावी लागते.  गांधीजी अहिंसेचे दूत आहेत त्यांच्या निशास्त्र सैनिकाला जग सलाम करते? पण कस्तुरबा त्यांच्या आयुष्यातून वजा करता येतील का

नात्यां
  • चे बंदण असेच असते.   प्रेमाच्या धाग्याने गुंफलेले ते उकळण्याचा प्रयत्न करू नका.  ब्रम्ह देवाला जमणार नाही.   पुरुष शेतकरी आत्महत्या करतात;  पण महिला करत नाहीत कारण त्यांच्यातील मातृत्व त्यांना तशी परवानगी देत नाही. 

एक वृद्ध झालेली आई आपल्या मुलाला विचारते, [ माझे डोळे गेले तर तू काय करशील?  तो मुलगा म्हणतो आई मी तुला जगाच्यापाटदिवर जिथे उपचार होतील तिथे नेऊन उपचार करीन?  मग तो मुलगा आईला विचारतो तू काय करशील आई म्हणाली मी माझे डोळे तुला देईन ह्या उत्कटतेने आपल्या पोटच्या गोळ्यासाठी ती समर्पित करून घेते.  त्याच संकल्पाने तिच्या स्वभाग्यासाठी  ती झटत असते. 

कौटुंबिक हिंसचारला बळी पडणारी महिला हुंडाबळी म्हणून प्राणाला मुखणारी नवविवाहित मुलगी पतीच्या संपट्टीत वाटा मागणारी स्त्री क्षमता असून नोकरी व्यवसाय न करता केवळ कुटुंबाची स्वयघोषित प्रतिष्ठा  जपण्यासाठी आपल्या इचहा मारणारी गृहिणी,  

एक पत्नी असते;  तिचा छल होतो.  तिला डांबून ठेवले जाते,  तिच्या आयुषाचे ध्येय केवळ नवऱ्याच्या इचहा पूर्ण करणे,  एवढेच आहे असे तिच्या मनावर लादले जाते.  म्हणून आता तिने सावध होणे गरजेचे आहे;  भावनिक दृष्ट्या विचार करणे थांबवून कृतिशील जीवन जगायला हवे.  व्यक्ति म्हणून आपल्या अधिकारांसाठि लढले पाहिजे.  आणि कुटुंबात फुट पडू न देता;  स्त्रीचे अधिकार पुरुषांनी नाकारू नये.  जणेकरून समाजिक विकासास बाधा येणार नाही;  आणि अवघे विश्वकही माझे घर या प्रमाणे आपल्या घरात तिला काम करण्यापासून रोखू नये.  तुमच्यासाठी जसी ती आहे तसे तुम्ही तिच्या साठी आहात.  तिच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवत असताना आपल्या जवाबदारि पासून दूर जाण्यात अर्थ नाही.  

एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंते पण सुरुवात स्वतः पासून सुरू करायला हवी जो पुरुष आपल्या पत्नीचा आदर करू शकत नाही तो जगातील कोणत्याच स्त्रीचा आदर करू शकत नाही.  म्हणून सन्मानाने जगण्यासाठी सन्मानाने जगवायला शिका 

फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा