प्रेमाचा बळी

            

    प्रेम आपल्या जगण्याला अर्थ देते,  प्रेम जगण्यास मदत करते,  प्रेम माणूस असल्याचे लक्षण असते.  ते व्यक्ती परत्वे भिन्न असते.  एक व्यक्ति अनेकांच्या रूणानुबंधात असते,  आईचे मुलावर असणारे निस्वार्थी प्रेम,  मुलांचे आई-वडील बहीण-भावू यांच्यावर असणारे प्रेम,  गुरु शिष्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम,  कुणाचे प्राण्यांवर निसर्गावर आपल्यातल्या कलेवर प्रेम असते. या सगळ्यांपलिकडे अधिक स्पष्ट जाणवणारे प्रेम असते तरुण- तरुणींमधले ते असते आयुषाचे नवीन स्वप्ने घेऊन जगण्याची उमेद बांधणारे आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून कर्तुत्वचा ताज निर्माण करणारे अनेकांच्या वाईट नजरांचा सामना करून टिकलेले कुटुंबियांचा राग पत्करून फुलवललेले;  त्यात असते वादळाला टक्कर देण्याची ताकद,  संकटाला भिडण्याची शक्ति,  एकमेकांसोबत असतात सर्वाधिक समाधान देणारे प्रेमी पण सुंदर कापडावर दाग पडावा / सुंदर चंदन अर्ध्यातउण तुटावे तसेच घडते जेव्हा प्रियकर त्याच्या प्रियसीची हत्या करतो.  त्यावेळी एखादा अपराध केल्यावर शिक्षा न्यायालय देण्यापूर्वी १०० वेळा विचार करते;  पण ज्याच्यावर विश्वास ठेवला आपले सर्वस्व अर्पण केले सात जन्म त्याची साथ मिळेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली तोच हत्या करेल असे जर तिला ब्रम्हदेवाने सांगितले असते तरी देखील तिने विश्वास ठेवला नसता. 

  • पण मुंबई नजीक बोहिसर इथे एक प्रियसी प्रेम केले म्हणून आपले बलिदान करून निघून गेली;  तिचा प्राण घेणारा तिचा प्रियकर होता.  काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे  मुळात शारेरीक आकर्षण आणि प्रेम दोनीही भिन्न गोष्टी आहेत.  उमलत्या वयात तरुण पिढी ते साप विसरते त्याचा असा परिणाम भोगावा लागतो.  तो केवळ त्या जोडप्या पुरता मर्यादित राहत नाही;  तर प्रेम विवाह करण्यात अनेकांना अडचणी येतात कारण आई-वडील अशा घटनांनी घाबरलेले असतात.  ते अशा विवाहाला नकार देतात म्हणून आपण विचार करावा. अशीच एक घटना त्यानंतर थोड्यात दिवसानंतर  मुंबईतील जोगेश्री    परिसरात  घडली. 

    त्या प्रेमी जोडप्याला प्रियसीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने तिला जाळण्याचा प्रयत्न केला.  तिने लगेच त्याला मिठी मारली दोघेही भाजले;  त्यात प्रियकराचा मृत्तिव झाला असून प्रियसीवर उपचार सुरू होते. त्यानंतर तिचे काय झाले माहिती नाही. म्हणून प्रेम विवाह वास्तव  कि आभास यावर विचार करावा त्यासाठी नक्की वाचा--  https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_31.html 

     अशा  घटना   घडतात यासाठी कोण जवाबदार आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्या आजूबाजूला सापडतील

    1 लैंगिक शिक्षण द्यावे-  शाळा-महाविद्यालयात लैंगिक शिक्षण दिले पाहिजे;  घरात या विशाई चर्चा होणे अवशक असते.  समाजातील जाणत्या लोकांनी तरूणांशी यावर संवाद साधायला हवा. 

    2 प्रेम आणि आकर्षणात फरक  असतो या वयात प्रेम कशाला म्हणायचे?  ते समजावून सांगणे गरजेचे असते प्रत्येकाने ती भिन्न लिंगी व्यक्ति तुम्हाला का आवडते?  यावर विचार करावा तुम्ही तिच्या / त्याच्या शिवाय राहू शकत नाही म्हणजे काय तर ते केवळ शारेरीक आकर्षण आहे.  ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीला त्रास कसे देऊ शकणार?  याचा जागृत बुद्धीने विचार करायला हवा.  प्रेम हे कर्तृत्वावर केले पाहिजे;  रंग रूप संपत्ति ही सर्व इथे दुय्यम दर्जाचे असते तुमचे सौन्दर्य तुमच्या कर्तृत्वातून झळकत असते.  जर एखाद्या व्यक्तीचे आकर्षण वाटत असेल तर इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला शिका.  त्या व्यक्तीला निवडण्याचे स्वातंत्र्य असते प्राणी देखील दुसऱ्या भिन्न लिंगी प्राण्यावर आपल्या इच्छा लादत नाहीत;  आपण तर माणूस आहोत. 

    3 सामाजिक वर्तन--  समाजात आज देखील प्रेमी जोडप्यांना मुक्तपणे वावरता येत नाही.  काही संघटना विनाकारण त्रास देतात लोक देखील तिरकस नजरेने पाहतात;  त्या सर्वांनी एक कायम स्मरणात ठेवले पाहिजे ही जोडपे देखील आपल्या समाजाचा घटक आहेत.  त्यांना आपण त्रास देणे म्हणजे त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावणे असते.  समाजाच्या अशा वागणुकीमुळे कितटीएक तरुणांना आपला जीव गमवावा लागला.   

    4 प्रेम विवाह विषयी जागृती--  जाती धर्माच्या भिंती प्रेमात कधीच अडथडा ठरत नाहीत पण प्रेम विवाह करताना त्या भिंती हिमाळ्यासारख्या उभ्या ठाकतात.  अनेक ठिकाणी नवप्रेमी जोडप्यांना घरातून काढून दिले जाते.  अनेक ठिकाणी सासऱ्याकडून जावयाची हत्या केली जाते.  मुलीला तिच्या कुटुंबियांकडून मारले जाते मग प्रश्न एवढाच पडतो हा एक अपराध आहे का? 

     निश्चित नाही ती एक निवड आहे आपल्या जीवन साठीची त्याचे स्वागत कुटुंबीयांनी तसेच समाजाने केले पाहिजे.  तसेच आपली कौटुंबिक जवाबदारी पारपाडणे हे आपले कर्तव्य आहे आई-वडिलांना वृद्धापकलात सांभाळणे आपले नैतिक कर्तव्य प्रत्येकाने पूर्ण करावे. तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करू नये. 

    5 सतर्कता--  आज अनेक व्यक्ती प्रेमात पडून फसवले जातात;  मग त्यांना नैराश्य येते.  काही लोक आत्महत्येचे पाऊल उचलतात हे सर्व थांबवायचे असेल तर वेळीच जागृत होणे गरजेचे आहे.  मुलींनी तुमचा प्रियकर केवळ शारेरीक सुखासाठी तुमचा वापर करतोय का? 

     त्याच्या फायदा करून घेण्यासाठी तुमचा उपयोग करून घेत नाही ना याची खात्री करून घ्या.  त्याला कुठले वेसण आहे का?  असेल तर त्याला तुमची सहमति आहे का? 

     त्याचे दुसऱ्या व्यक्तीशी अशा प्रकारचे संबंध आहेत का? 

     याची माहिती मिळवावी.  तसेच मुलांनी देखील आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.  अनेक ठिकाणी मुली काही प्रसंगांचे चित्रण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.  याचे भान असू द्यावे

    शेवटी आपलयाआयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असावे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. 

    प्रेम करा आनंदाने जगा स्वतः जगा इतरांना जगू द्या     


  • फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा