विवाहाचं खरं वय
सृष्टीवरचा प्रत्येक सजीव आपल्या वंशजांना जन्म देतो; निसर्गाने तशी तरतूद केली आहे. मानव सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहे असे त्याने स्वतः जाहीर केले. पण इतर प्राण्यांना वाचा नसल्यामुळे तसेच स्वार्थी माणसाने त्यांच्याकरिता अब्रू नुकसानीचा कायदा केला नाही म्हणून ते माणसाच्या श्रेष्ठतेला आव्हान देऊ शकत नाहीत. टोळीतील माणसाच्या पुढे अनेक टोळ्या झाल्या; परिणामी त्याच्या गरजा विस्तारल्या सत्तेच्या महत्वकांक्षा वाढल्या म्हणून त्याने कुटुंब या संस्थेची स्वतःच्या रक्षणासाठी आणि समाज नावाच्या संस्थेची समूहाच्या रक्षणासाठी स्थापना केली. यात सुसूत्रता आणण्यासाठी सर्वांचे हित जोपासण्याच्या हेतूने आपल्या मुलांवर अनेक संस्कार करायला माणूस नावाच्या जातीच्या प्राण्याने सुरुवात केली. नामकरण संस्कारापासून अंत्य संस्कारापर्यंत वयाच्या सर्व टप्प्यावरचे सुसंस्कार निश्चित केले. त्यातीलच सार्वकालीन आणि सर्वत्र अतिमहत्वाच्या संस्कार ठरण्याचे भाग्य विवाह संस्काराला लाभले. विवाहाच्या पद्धती काळ सापेक्ष त्याचबरोबर व्यक्तिसापेक्ष असतात पण मुख्य हेतू मात्र जगात सर्वत्र कुट...